Home
Pravasi Pakshi
Loading Inventory...
Barnes and Noble
Pravasi Pakshi
Current price: $13.99
Barnes and Noble
Pravasi Pakshi
Current price: $13.99
Loading Inventory...
Size: OS
*Product Information may vary - to confirm product availability, pricing, and additional information please contact Barnes and Noble
कविवर्य कुसुमाग्रजांनी आजवर कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललितनिबंध असे विविध प्रकारचे साहित्य लिहिले असून त्याद्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. या सर्व साहित्यात त्यांचे काव्य आणि नाटक हे वाङ्मयप्रकार विशेष गाजलेले असून त्यांचा ठसा मराठी मनावर उमटलेला दिसतो. या दोहोंतही कवितेचा ठसा अधिक खोलवर उमटलेला आहे असे जाणवते. हा ठसा केवळ रसिकांच्या मनावर उमटला आहे असे नाही तर कुसुमाग्रजांच्या सौंदर्यदृष्टीचा आणि शैलीचा संस्कार मराठी कवितेवर झालेला आहे, असेही आढळून येते. कुसुमाग्रजांची कविता ही, केशवसुतांपासून निर्माण झालेल्या एका वैभवशाली कालखंडातला महत्त्वाचा भाग असून ती गेली जवळ जवळ साठपासष्ट वर्षे नवनवीन उन्मेशांनी बहरत राहिलेली आहे. कुसुमाग्रजांच्या 'छंदोमयी', 'मुक्तायन' व 'पाथेय' या तीन संग्रहांतील निवडक कवितांचा 'प्रवासी पक्षी' हा संग्रह असून 'रसयाinters वीस वर्षातील कुसुमाग्रजांच्या कवितांचे स्वरूप या संकलनाद्वारे वाचकांना एकत्रितपणे पाहावयास मिळेल